आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील यांच्या विहिरीमध्ये एक रानगवा पडल्याचे सकाळी त्यांच्या निदर्शनास आले. घाणेकर यांनी कोणताही वेळ न घालवता तात्काळ या घटनेची माहिती वन विभागाला दिली .
माहिती मिळताच, गुहागरचे वनपाल अमित निमकर आणि त्यांच्या बचाव पथकाने क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीची खोली आणि रानगव्याचा अवाढव्य आकार पाहता हे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र वन विभागाच्या टीमने अत्यंत कौशल्याने विहिरीमध्ये रेस्क्यू जाळी सोडली. रानगव्याला कोणतीही दुखापत किंवा इजा होणार नाही, याची पूर्ण खबरदारी पथकाकडून घेण्यात आली होती…
अखेर वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर या रानगव्याला विहिरीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात रानगव्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, वैद्यकीय तपासणीत त्याची प्रकृती अगदी सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार, या रानगव्याला पुन्हा एकदा त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सुखरूप मुक्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या या तात्काळ आणि यशस्वी कामगिरीचे गुहागर परिसरातून मोठे कौतुक होत आहे.









