नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद..!
आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष पाथरे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी
पाटपन्हाळे हायस्कूल समोर, शृंगार तळी येथे विविध मागण्यांसाठी संविधानिक मूल्यांचे पालन करून लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण पद्धतीने स्वाक्षरी मोहीम पाटपन्हाळे हायस्कूलसमोर राबविण्यात आली.या मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची पूर्ण काळजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आली.
तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही आणि सार्वजनिक शातता व सुव्यवस्था अबाधित राहील, याची योग्य ती दक्षता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरिकांना मनसेच्या या मागण्यांना आपला पाठिंबा असेल तर कृपया रजिस्टरवर आपलं नाव आणि सही करावी. असे आवाहन करण्यात आले मनसेच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रमुख मागण्यांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचा राजीनामा. झालेली एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी. मतदान बॅलेट पेपरवरच. ईव्हीएम नको.स्वच्छ आणि पारदर्शक मतदार यादया. निवडणूक आयोगाने यापुढे सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊनच निवडणूक प्रक्रिया राबवावी. आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी उप जिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर , मनविसे तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले,असगोली गण उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर,पडवे गण उप तालुका अध्यक्ष सचिन गडदे, कौढर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, सांस्कृतीक विभाग अध्यक्ष राहुल जाधव,शृंगार तळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर,गुहागर शहर अध्यक्ष अभिजित रायकर, शृंगारतळी गण उप तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव,मनसे सैनिक प्रमोद म्हसकर, जानवळे विभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार , अपेक्षा हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.









