गोरेगावकारांचे सहकार्याने
अर्बन बँकेस उर्जितावस्था मिळाली-श्री अनिल देव
राम भोस्तेकर माणगाव
ग्राहकांचा विश्वास, सहकार्य आणि बँकेशी जोडलेले जिव्हाळ्याचे नाते ही कोणत्याही बँकेच्या यशस्वी वाटचालीची खरी शिदोरी असते. याच विश्वासाच्या बळावर दि. वाई अर्बन को-ऑप. बँकेच्या गोरेगाव शाखेने आठ वर्षांचा सेवाप्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
या मुळे ठेवींच्या बदलेल्या आकर्षक व्याजदराचा व नवीन दीपलक्ष्मी ठेव योजना सर्व ठेवीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा..
दि. वाई अर्बन को-ऑप. बँकेच्या गोरेगाव शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित या प्रसंगी ग्राहक आणि बँकेच्या प्रतिनिधींमध्ये स्नेहपूर्ण संवादाचे वातावरण निर्माण झाले होते. शाखेच्या आठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
बँकेने आपल्या ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीच्या माध्यमातून गोरेगाव परिसरातील ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने शाखेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले असून, वर्धापन दिनाच्या निमित्ताने बँक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाखाधिकारी प्रसाद वैराट, सतीश पाटणे, तेजस जाधव, विक्रांत कुलकर्णी, महेश तटकरे, कैलास साटोटे, प्रमोद कळंबे आणि महाडिक यांनी केले याच बरोबर चंद्रकात गोरेगावकर, विनोद बागडे, भारत गोरेगावकर, नंदू शिर्के, चेतन गिरासे, सुबोध बेंडखळे मुबीन टोल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








