महाराष्ट्र ग्राम विकास परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार प्रदान कार्यक्रमांमध्ये होणार सन्मान
आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत संस्था, महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र ग्राम विकास परिषद, पुणे(महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने बोरगाव ता. चिपळूण ग्रामपंचायतचे सरपंच व मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार 2026 आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुनील हळदणकर यांनी गावाच्या विकासासाठी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेले उल्लेखनीय काम व योगदान यांची दखल घेऊन आपली महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार २०२६ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. दि.१५ नोव्हेंबर रोजी पुणे (महाराष्ट्र) येथे करण्यात येणार आहे. या निवडीचे पत्र डॉ. दिपक दादाराव जाधव (संस्थापक अध्यक्ष, टॅलेंटकट्टा ) यांनी दिले आहे. त्यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत







