आबलोली (संदेश कदम)
कोकणामध्ये बागेची नासधूस माकडे करतात तर आम्ही गुहागर मध्ये एक ब्रह्माकूल मेडिकेशन शिकवले जाते ज्याचा मला गर्व वाटतो की, आपल्या देशाच्या मान. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मजी या रोज पहाटे अडीच वाजता उठून त्याचा अभ्यास करतात. त्या राजयोगाच्या डिप्रेशन मधून बाहेर आल्या आहेत. तुम्हाला याची हिस्ट्री युट्युब वर पहायला मिळेल. जी माकडं बागेची नासधूस करतात.त्या माकडांवर मीडिशन मध्ये जर आपण संकर शक्तीचा प्रयोग केला तुम्हाला या शेती मधील ट्रेनिंग पाहिजे असेल तर आमदार भास्कर जाधव साहेबांनी तशी व्यवस्था केली तर तेही ट्रेनिंग देता येईल अशी मौलिक माहिती गुहागरच्या सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय ब्रह्माकुमारी बहेनजी सीमा यांनी आमसभेत देऊन मौलिक मार्गदर्शन केले.
गुहागरच्या सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय ब्रह्माकुमारी बहेनजी पुढे म्हणाल्या की, दुसरा विषय असा की, डायबिटीसची राजधानी म्हणून भारताला घोषित करण्यात आले आहे. आणि हार्ट अटॅकचे प्रमाण जे वाढलंय त्यासाठी ब्रह्मापूर विद्यालयाच्या वतीने 1988 सालापासून ज्या लोकांनी आपल्याशी संपर्क केला मेडिटेशनचा आपल्या जीवनात अवलंब केला त्यांना पुन्हा अटॅक आलेला नाही परंतू तीन-तीन महिन्यात दहा – दहा ब्लॉकेज खुले आहेत. यासाठी राष्ट्रपती डॉ. पी.जे. अब्दुल कलाम यांनीही मौलिक माहिती दिली आहे.सतीश गुप्ता यांची महाजननी पण आपल्या हृदयाचे मेंटेनेस कसे करावे? विना बायपास विना एन्जोप्लासी या संदर्भात पण विद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ब्रह्माकुमारी बहेनजी सीमा यांनी केले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 ऑक्टोबरला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि स्पंदन मिशन यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानाचा जो सिलसिला झाला त्याच्यामध्ये 125 अध्यात्मिक संस्था उभारल्या गेल्या त्यामध्ये ब्रह्माकुमारी विद्यालयानेही उस्फुर्त सहभाग घेतला आणि या संदर्भात आम्ही साडेआठ करोड लोकांपर्यंत पोहोचलो. यासाठी आम्हाला ईश्वरी मदत मिळाली.गुहागर तालुक्यात पाचोरे आगर दोन हायस्कूल, कोतळूक, काजुर्ली आणि शीर गावातील पाच शाळा सोडून आम्ही सर्व हायस्कूलमध्ये एक तासभर जागृती साठी प्रेरणा म्हणून प्रीटेशन करून प्रतिज्ञा करून घेतली आणि या संदर्भात ब्रह्मकुमारी विद्यालयांमध्ये होमिओपॅथिक औषधे विकणे दारू आणि तंबाखू संदर्भात कित्येक लोकांची,करोडो लोकांची दारू सुटलेली आहे. यासाठी जे इच्छिक असतील त्यांनी संपर्क साधा असे आवाहन करून पुढील पिढीसाठी अशी कोणावर वेळ येऊ नये म्हणून जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा आपण करावी असेच सांगून ब्रह्माकुमारी बहेनजी सीमा यांचेकडून आमसभेतील उपस्थित सर्वांनी प्रतिज्ञा ग्रहण केली.









