आबलोली (संदेश कदम)
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी रिटायर पीएसआय इंद्रजीत मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी विक्रमगड तालुक्यातील सावराई, मेढे, कराचीपाडा, गबाळेपाडा, सावरखिंड या आदिवासी पाड्यांमध्ये सुमारे 300 घरांना दिवाळी साहित्य, लहान मुलांना नवीन कपडे वाटप आणि 250 विद्यार्थ्यांना सोलर लाईटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
यावेळी राजेश भोजने, अतुल चव्हाण, तिखे, राजेशदादा मासवकर, दिपू सिंह, संजय गांगुर्डे, सचिन, तेजा, महादेव टिके, गौरव पिंगळे, सचिन महेंद्रकर, तेजस चव्हाण, नितीन घायतडके, कैलास बागुल, जितेंद्र येवले, संदेश माने यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमात सावरगाव चे सरपंच कैलास गांगुर्डे आणि त्यांच्या ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले.
हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी स्नेहा चाळके, प्रदीप नाईक, रवी काजरोळकर, जयवंती प्रभू, हेमंत परब, नीलम कदम या सर्वांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सढळ हस्ते आर्थिक मदत केल्याने हा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला











