मुंढर दि. १४ (रामदास धो. गमरे)
मुंढर गावचे सुपुत्र, बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ चे माजी अध्यक्ष, जैतवन बुद्ध विहाराच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणारे, IIT पवई सिव्हिल डिपार्टमेंटमधील निवृत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक दिवंगत सीताराम पांडुरंग गमरे यांच्या सुकन्या तसेच दीपक सीताराम गमरे यांची बहीण पूर्वाश्रमीच्या डॉ. सुषमा सीताराम गमरे तथा विवाहानंतरच्या डॉ. संपदा वीरेंद्र जाधव यांनी “ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या अध्यापन व अध्ययन शैलीचे मूल्यमापन व अभ्यास एक विषय” या विषयावर मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी संपादन करून गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अभिमानास्पद यशाची नोंद केली असून डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी संपादन करणाऱ्या त्या मुंढर गावच्या पहिल्या सुकन्या ठरल्या आहेत, त्यांच्या या संशोधनात्मक वाटचालीत डॉ. प्रतिभा ए. गोखले यांनी सदर विषयाच्या संशोधनासाठी मौलिक मार्गदर्शन केले, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला महत्त्वपूर्ण दिशा लाभली.
मुंढर गावच्या सुकन्या डॉ. सुषमा सीताराम गमरे यांच्या ऐतिहासिक यशामुळे मुंढर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून या यशामुळे मुंढर गावातील शैक्षणिक प्रगतीला नवी प्रेरणा मिळाली आहे, गावातील विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणादायी आदर्श ठरल्या असून विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांचे यश शिक्षण, जिद्द आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा देणारे आहे त्यामुळे त्यांनी संपादन केलेल्या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुषमा सीताराम गमरे यांच्या यशामुळे दिवंगत सीताराम पांडुरंग गमरे व वीरेंद्र जाधव अशा माहेर व सासर या दोन्ही कुटुंबाचा गौरव वाढला असून, मुंढर गावाच्या प्रतिष्ठेतही मानाची भर पडली आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून, भविष्यातही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नवनवीन यशाची शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









