गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र आणि पत्रकार मंगेश जाधव “कोकणरत्न” पदवी पुरस्काराने सन्मानित
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र आणि पत्रकार मंगेश राजाराम जाधव यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने “कोकणरत्न” पदवीने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई येथील मराठी पत्रकार संघ येथे स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष सन्माननीय संजयजी कोकरे, सचिन कळझुणकर, लायनल वेलोज आदी मान्यवरांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र आणि पत्रकार मंगेश राजाराम जाधव यांना “कोकणरत्न” पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पत्रकार मंगेश जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या आणि सामान्य माणसाच्या व्यथा आणि कथा समस्या आपल्या लेखणीने प्रखरपणे मांडल्या आहेत. पत्रकार मंगेश जाधव यांनी दैनिक कोकण गर्जना, दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक प्रहार, दैनिक सामना, दक्ष पोलीस टाइम्स, साप्ताहिक कोकण एक्सप्रेस, दिशा महाराष्ट्राची,साप्ताहिक गुहागर टाइम्स, दैनिक रत्नागिरी वार्ताहर, पूर्णसत्य कोकण न्यूज, दैनिक गुहागर सत्ता अशा विविध वृत्तपत्रातून आणि आधार महाराष्ट्र न्यूज चॅनल, आपल्या लेखणीतून अन्यायाच्या विरोधात प्रखर भूमिका मांडली आहे. आणि न्याय मिळवून दिला आहे.
पत्रकार मंगेश जाधव यांना यापूर्वी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय प्रतिभारत्न पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संघ मुंबई यांचा राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप तसेच दिशा महाराष्ट्राची न्यूज चॅनलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी पत्रकार संघ मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने “कोकणरत्न” पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार मंगेश जाधव यांच्या पुरस्काराने तळवली गावासह गुहागर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पत्रकार मंगेश जाधव यांच्यावर गुहागर तालुक्यातून विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्तरातून अनेक मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देण्यात येत आहेत.










