आबलोली(प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने दिवाळीनिमित्त अर्धशास्त्रीय नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नृत्य कलाकार वैष्णवी पांचाळ-पारकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे धडे दिले.
श्री नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी वासुदेव पांचाळ, सदानंद पांचाळ, गणपत पांचाळ, श्रीकांत पांचाळ,प्रा.अमोल पवार, विनोद पेढे, नितेश पांचाळ हे उपस्थित होते
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानवी पांचाळ यांनी केले तसेच कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संदेश पांचाळ, गौरव पांचाळ, पंकज पांचाळ यांनी विशेष प्रयत्न केले.










