आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीने सन 2025 – 26 मध्ये राबवण्यात आलेल्या “संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान” अंतर्गत जिल्हा परिषद पडवे गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांना गुहागरच्या आमसभेमध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांचे हस्ते आणि चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांतदादा जाधव, महेश नाटेकर, प्रमोद गांधी,गौरव वेल्हाळ, आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्यावतीने सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, उद्योजक सचिन बाईत, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, पत्रकार संदेश कदम यांनी आबलोली गावाच्या वतीने हे सन्मानपत्र स्विकारले.








