आम .भास्करराव जाधव व माजी आम .रमेशभाई कदम यांच्या हस्ते मोठ्या थाटात उदघाटन संपन्न
राजकीय, सामाजिक, सहकार आणि व्यावसायिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती
आबलोली (संदेश कदम)
कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीला आधुनिक आदरातिथ्याची जोड देत चिपळूणच्या व्यावसायिक क्षेत्रात दोन नव्या खाद्यदालनांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मार्कंडी येथील ‘शिंदे मळा हाऊस’ आणि विया बेंने या दोन उपक्रमांचे रविवारी सायंकाळी राजकीय, सामाजिक,उद्योजक मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न झाले.आमदार भास्करराव जाधव आणि माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते या दोन्ही दालनांचे उदघाटन पार पडले. राजकीय, सामाजिक, सहकार, नगरपरिषद आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रंगला.या उदघाटन सोहळ्याला विविध राजकीय पक्षाची नेते मंडळी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने एक वेगळे वातावरण पाहायला मिळाले.शिवसेना नेते आम .भास्कर जाधव,माजी आम .रमेश कदम,माजी आम .सदानंद चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.








