माणगाव (सलीम शेख)
भाजप पक्षाचे पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशाने पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी माणगाव येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या यशोधरा गोडबोले यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल गोडबोले यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी लेखी कळविले आहे. यशोधरा गोडबोले यांच्या या पुनर्नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यशोधरा गोडबोले या माणगाव शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कट्टर व निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. त्यांनी माणगाव शहरासह तालुक्यात, जिल्ह्यात भाजप संघटन मजबूत करण्याचे काम गेले बारा वर्षे निष्ठेने केले आहे. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यातून महिलांना संघटित करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे. माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या कार्यकाळात चांगले काम केले. त्यानंतर त्यांना प्रदेशावर काम करण्याची संधी देण्यात आली. पक्षाच्या महिला प्रदेश सचिव म्हणून यापूर्वीही त्यांनी चांगले काम करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अनेकांना मिळवून दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत असे काम त्या करीत असल्यानेच पक्ष नेतृत्वांनी पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन पक्षाच्या महीला मोर्चा प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. आपल्या निवडीबद्दल प्रसार माध्यमांजवळ बोलताना यशोधरा गोडबोले यांनी सांगितले की,मी सर्वप्रथम पक्ष श्रेष्ठींचे आभार व ऋण व्यक्त करते. या नेत्यांनी माझ्यासारख्या ग्रामीण भागातील महिलेवर विश्वास दाखवून माझी पुन्हा एकदा पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली. या नेते मंडळींचा विश्वास सार्थ ठरवून मी यापुढेही महिलांना संघटित करून पक्षाचे काम करणार आहे. पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देईन असे सांगत पक्षाची ध्येय – धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना सामाजिक कार्याच्या जोरावर अधिकतम वाढविणार असल्याचे सांगितले.








