आपदा मित्र संतोष मोरे यांचा स्वर कला संघ गोवा सरकार कडून सन्मान
9 आक्टोबर 2026
महाड (चंद्रकांत पाटणे)-
स्वर कला संघ गोवा व समाज कल्याण संचलनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा कौतुक सन्मान सोहळ्यामध्ये महाड एमआयडीसी मधील प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल कंपनीमध्ये कार्यरत असणारे करंजखोल गावचे रहिवाशी आपदा मित्र संतोष मोरे यांना गोवा सोशल एक्सलन्स 2026 हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
संतोष मोरे यांना हा अवॉर्ड गोवा सरकारचे आमदार गोविंद गावडे,आमदार पेमेंद्र शेट व सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व शाल देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.हा सन्मान म्हणजे महाड-रायगडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.मोरे यांनी सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातही तालुका,जिल्हा आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.दरड कोसळणे,महापूर,
चक्रिवादळ, कोरोना महामारी तसेच अपघात अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत मोरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कित्येक नागरिकांना मदत केली आहे.अनेकांना त्यांनी संकटातून बाहेर काढत जिवनदानाचे कार्य केले आहे. त्यांनी नुकताच 20 सप्टेंबर रोजी सावित्री नदीपात्रात अडकलेल्या इसमाचे प्राण वाचवले आहे.त्यांच्या या सामाजिक आणि आपत्ती व्यवस्थापनातील उल्लेखनीय काम गिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या,महसूल विभागासह विविध सामाजिक संस्थां संघटनांकडून त्त्यांचा गौरव करण्यात आला आहे.उरण येथील महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडूनही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. संतोष मोरे यांच्या कार्याची गोवा सरकारकडून दखल घेत त्यांना अवॉर्ड देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्ष होत आहे.








