माणगाव /वार्ताहर.
साहित्यरत्न लोकशाहीर मातंग समाजाचे आराध्य दैवत अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती १ ऑगस्ट रोजी माणगावमध्ये गोरगरीब सामजिक विकास मंडळ माणगाव यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोरगरिब सामजिक विकास मंडळ माणगाव चे अध्यक्ष वसंत जाधव, कार्याध्यक्ष नाना खंडागळे,उपाध्यक्ष संतोष माने, खजिनदार रामभाऊ लोणके, उप खजिनदार संदेश लाडगे, सचिव धनाजी उडानशिवे, सहसचिव तानाजी उडानशिवे, चंदू जरपटके, संदीप पोवळे, सागर पोवळे , कृष्णा बाभूळकर व महिला मंडळ अध्यक्ष अरुणा लोणके, महिला कार्याध्यक्षा संगीता खंडागळे आणि महिलावर्ग व युवा वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी माणगावमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सह डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी गोरगरिब सामजिक विकास मंडळ माणगाव सदस्यांकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा विजय असो, लहुजी साळवे यांचा विजय असो, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी माणगाव मधील जयंती उत्सव परिसर दुमदुमून गेला होता. आपले मनोगत व्यक्त करताना गोरगरीब सामजिक विकास मंडळाचे अध्यक्ष वसंत जाधव म्हणाले की, आमच्याकडून मातंग समाजाचे आराध्य दैवत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येते, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य अजरामर रहावे आणि त्यांचे कार्य साहित्य समाजाप्रति पोहचावे हेच प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जयंती साजरी करण्यात येते.अशा प्रकारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती माणगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडली.








