गुहागरच्या जानवळे गावात मनसेचा स्तुत्य उपक्रम
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उभारला भव्य मनसे वनराई बंधारा..!
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा पुढाकार
आबलोली (संदेश कदम)
उन्हाळ्यात येणाऱ्या पाणीटंचाईचे संकट ओळखून, त्यावर आतापासूनच मात करण्यासाठी गुहागर तालुक्यातून एक कौतुकास्पद बातमी समोर येत आहे. गुहागर तालुक्यातील जानवळे गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने एक भव्य मनसे वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर व्हावी आणि गावातील पाण्याचा स्तर वाढावा, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जानवळे गावातील ग्रामस्थ, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी शृंगारतळी जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद गांधी आणि मनसे जिल्हाध्यक्ष मनीष पाथरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खेतले, जानवळे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, शेतकरी संघटना गुहागर तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, शृंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, सचिन गडदे, शिवसेना विभाग प्रमुख पिंट्या संसारे, ग्रामसेवक गोरखनाथ सोनवणे, अपेक्षा हळदणकर, चिपळूणच्या ऍड. वृषाली सावंत, राजेंद्र गोजारे, मंगेश धामणस्कर, मुसतकीन शाह, अलताफ शेख, विनोद चिपळूणकर, जितेंद्र शिरगांवकर, प्रविण लांजेकर, कमलाकर वनगे, सुजित गांधी तसेच ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. गावच्या पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे आणि ग्रामस्थांच्या व विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.








