माणगाव /प्रतिनिधी
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी उद्याच्या भवितव्याच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम होऊन माणगावमधील आदिवासी समाजाची हि वास्तू चालती बोलती असावी असे प्रतिपादन रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. खासदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्याला माणगाव तालुका आदिवासी भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वा. रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जुने माणगाव शासकीय विश्राम गृहाजवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे,तालुकाध्यक्ष काका नवगणे,जेष्ठ नेते शेखर शेठ देशमुख,पक्षाचे नेते आनंद यादव,गजानन अधिकारी,राजिप सदस्या दिशा जाधव,जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शादाब गैबी,माणगाव पंचायत समिती उपसभापती मनीषा मालोरे,नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे,पंचायत समिती सदस्या संगीता बक्कम,पंचायत समिती सदस्य अक्षय जाधव,उपनगराध्यक्ष रिया उभारे,माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर,माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,संदीप खरंगटे ,स्थानिक नगरसेवक दिनेश रातवडकर,नगरसेविका लक्ष्मी हिलम,पक्षाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र शिर्के,कार्याध्यक्ष अँड.सुशील दसवते,राष्ट्रवादीचे माणगाव शहराध्यक्ष सुनील पवार,स्वीकृत नगरसेवक विठोबा पालकर,माजी नगरसेवक जयंत बोडेरे,युवानेते सिद्धांत देसाई,आदिवासी समाजाचे नेते रमेश कोळी आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते,आदिवासी संघटना माणगाव तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना खा.सुनील तटकरे पुढे म्हणाले कि,आदिवासी समाजासाठी उत्तमप्रकारे हि वास्तू उभारण्यात आली आहे. माझ्या खासदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी या माणगाव तालुका आदिवासी भवनाला देता आले याचे मला अंतकरणापासून समाधान वाटतो आहे. जंगलचा राजा म्हणून आदिवासी समाजाची खरी ओळख आहे. हा समाज आता हळूहळू मुख्य प्रवाहात येत असून व्यसन मुक्तीच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाकडे मोठ्या संख्येने हा समाज जात आहे. शिक्षणाच्या बाबतीतही आता हा समाज सतर्क झाला असून समाजाचे बांधव – भगिनी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत. आदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या व्यक्तिगत लाभाच्या व महिला बचत गटासाठी योजना आहेत. या योजनांचा आदिवासी समाज बांधवानी लाभ घ्यावा त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सारे मंडळी करू. वनहक्क कायद्याअंतर्गत तुम्हाला मिळालेली जी जमीन आहे ती जमीन भारत व राज्य सरकारच्या माध्यमातून तुमचा खासदार या नात्याने तुमच्या नावावर केली जाईल असा शब्द खा.तटकरे यांनी आदिवासी बांधवाना देऊन जागतिक आदिवासी दिनाच्या आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रास्ताविकात बोलताना माणगाव तालुका आदिवासी समाचाचे नेते रमेश कोळी यांनी सांगितले कि,खा.तटकरे साहेब यांच्या सहकार्याने माणगावला आम्हा समाज बांधवांसाठी हि वास्तू मिळाली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी पाठपुरावा केला. तसेच पक्षाच्या तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांचीही त्यासाठी योग्य साथ मिळाली. सर्वांच्या सहकार्याने हि वास्तू माणगावात उभी राहिली. हि वास्तू तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांची असेल. तटकरे साहेब हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असल्याचे या वास्तूच्या निमित्ताने दिसून येत आहे. असे सांगत त्यांनी खा.तटकरे साहेब,मंत्री आदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पक्षाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र शिर्के यांनी केले.











