माणगाव – प्रतिनिधी.
दि ६ ऑगस्ट २०२६ रोजी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घरगुती एल पी जी ग्राहकांनी ई के वाय सी करण्याकरता १६ ऑगस्ट ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. तरी सर्व ग्राहकांनी या मुदतीच्या आत आपल्या घरगुती गॅस कनेक्शनची ई के वाय सी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्या ग्राहकांना शक्य असेल त्यांनी माणगाव भारतगॅस एजन्सी कार्यालय जेबीडी प्लाझा, एच डी एफ सी बँक समोर माणगाव या पत्त्यावर सदर कार्यालयात येऊन १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जे ग्राहक आजारी असतील किंव्हा ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना माणगाव कार्यालयापर्यंत येणे शक्य होणार नाही मात्र ते ग्राहक माणगाव भारत गॅस एजन्सी च्या कार्यक्षेत्रातच वास्तव्यास असतील त्यांनी माणगाव भारतगॅस एजन्सी कार्यालयात संपर्क साधावा त्यांची घरी येऊन ई के वाय सी करण्यात येईल. मात्र सर्व ग्राहकांनी आपली केवायसी १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी करून घ्यावी असे आवाहन माणगाव भारतगॅस एजन्सी कडून करण्यात आले आहे.










