विशेष आकर्षण : कवायत संचलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा
माणगाव प्रतिनिधी :
रा. जि. प. शाळा रेपोली येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कवायत संचलन तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शाळेत दरवर्षी BDS, BTS, मंथन, नवोदय तसेच शिष्यवृत्ती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षांना बसविले जाते. यामध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विशेष गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
गुणगौरव झालेल्या विद्यार्थ्यांची नावे :
इयत्ता पहिली : श्रद्धा जालिंदर आखाडे, जीवन गणेश मोरे.
इयत्ता दुसरी : उत्कर्ष जीवन तोरमल, रुद्र वीरेंद्र पिसाळ, कार्तिक सखाराम शिगवण, आयांश नरेश ढमाल.
इयत्ता चौथी : स्वयंम हरेश बेंदुगडे, तुषार महादेव जांबरे, स्वराली सुधीर शिगवण, पार्थ निलेश मोरे.
इयत्ता पाचवी : जय सिद्धेश शिगवण, आरोही हरेश बेंदुगडे, जिया राजाराम धसाडे.
इयत्ता सहावी : आर्या मंगेश शिगवण, ओवी कल्पेश पिसाळ.
इयत्ता सातवी : केतकी कृष्णा अंधेरे, वेद रामदास ढमाल, आर्या नारायण शिगवण.
याशिवाय ९ ऑगस्टपासून शाळेत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, तिरंगा रॅली, गीतगायन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. कल्पेश तुकाराम पिसाळ उपस्थित होते. तसेच गावकी अध्यक्ष रघुनाथ बेंदूगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सिद्धेश शिगवण, शंकर जांबरे, सुभाष शिगवण, कांता बेंदूगडे, शरद मोरे, केशव जांबरे, नरेश ढमाल, महादेव जांबरे, रश्मी जांबरे, जनार्दन ढमाल, निलेश मोरे, रामदास ढमाल, समीर अंधेरे, अनिल महाडीक, किशोर कांबळे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंगणवाडी सेविका पूनम जांबरे, तेजस्विनी भोईर आदींचीही उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गालिंदे, तसेच सुनील गोरेगावकर, जीवन तोरमल आणि वर्षा भुसे यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या कवायत संचलनासह गुणगौरव सोहळ्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.









