माणगाव -प्रतिनिधी
१५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ८ वा यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अमित शेष यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अधिष्ठाता संशोधन व विकास डॉ. एस एम पोरे, परीक्षा नियंत्रक डॉ गीतांजली महामूणकर , विद्यापीठाचे विभाग प्रमुख ,प्राध्यापक वर्ग ,अधिकारी, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून विद्यापीठात काम करणारे कर्मचारी परंतु पुढील काही दिवसांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठातर्फे माननीय कुलसचिव यांस कडून सेवानिवृत्त होणाऱ्या मान्यवरांचे गुणगौरव करण्यात आले व सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
यानंतर विद्यापीठातील उपस्थितांना माननीय कुलसचिव यांनी भाषण करून संबोधित केले.
सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा NCC चे मेजर डॉ.मिलिंद भगत यांनी केले असून याचे सर्व सहकार्य एनसीसी चे कॅडेट ने केले आणि ८० व्या स्वातंत्र दिनाचा कार्यक्रम हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मा.कुलसचिव ,अधिष्ठता व इतर अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचाही कार्यक्रम राबवण्यात आला.









