श्रीवर्धन प्रतिनिधी -सोपान निंबरे
पर्यावरण संवर्धन, शांतता, करुणा आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी आयोजित ‘बोधी वृक्षारोपण अभियान’ शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाले. सिद्धार्थ ग्राम सेवा मंडळ व सिद्धार्थ कला निकेतन यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात नागरिक, पर्यावरणप्रेमी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत वृक्षारोपण केले.
बोधी वृक्षाच्या माध्यमातून शांतता, करुणा आणि जागृतीचा संदेश देत ‘चला, झाडे लावू या आणि जागृत होऊ या’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.
या उपक्रमास अध्यक्ष विद्यानंद पवार, उपाध्यक्ष उद्धव पवार, सरचिटणीस महेश पवार तसेच पराग पवार, संजय पवार, बलराज पवार, जनदास पवार, मनोज पवार, विनोद पवार, सचिन पवार, रमेश पवार, रोहित गमरे, वृषाली जाधव, अमित पवार, अभिजीत कासारे, सुयोग पवार, स्नेहल पवार, दिनेश पवार, रुपेश गमरे, प्रथमेश पवार, विनय गमरे आदी उपस्थित होते.
तसेच स्थानिक पदाधिकारी संदीप गमरे, स्वप्नील पवार व निलेश पवार यांच्यासह हरिश्चन्द्र जाधव, वंदना पवार, सुजित पवार, अक्षय पवार, सुनील पवार, संस्कार पवार, सार्थक पवार, सिद्धांत पवार, निहाल पवार, लतिका पवार आदींनी सहभाग घेतला.
वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा बिघडणारा समतोल लक्षात घेता अशा उपक्रमांची गरज असून, प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.









