माणगाव(प्रतिनिधी )
सहकार क्षेत्रातील सुवर्णक्रांती अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेड शाखा माणगाव या शाखेचा तृतीय वर्धापनदीन सोहळा शनिवार दि,.१५ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेचे संस्थापक एस. एम. म्हात्रे,संचालक शीतल पंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक सुखदेव म्हात्रे यांच्याहस्ते माणगाव शाखेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.
या वर्धापन दीन सोहळ्यात संस्थेचे सर्व शाखाधिकारी तसेच संस्थेच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थतर्फे संस्थापक एस. एम. म्हात्रे,संचालक शीतल पंडागळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती देऊन संस्थेच्या भरभराटीस सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे माणगाव शाखाधिकारी राकेश पडवळ यांनी केले. या सोहळ्यास संस्थेचे मोर्बा प्रमुख संदीप सकपाळ, डोंबिवली ब्रँच अन्वी कदम अमोघ कदम गुणवंत सर सुनील भोईर विकास शिंदे नेरळ खोपोली प्रमुख संदीप वाकले,बदलापूर अंबरनाथ प्रमुख राजेश काठावले, कुलदीप पवार, कामोठे प्रमुख सुदाम कानावडे,उरण प्रमुख राम म्हात्रे शोभा म्हात्रे ज्योत्स्ना म्हात्रे,नेरळ प्रमुख संगीता चव्हाण, राहुल देवळेकर सर माणगाव प्रमुख अक्षता मोरे, पूजा शिर्के भक्ती नागावकर प्राची महाडिक, उत्कर्षां पिलणकर , इंदापूर प्रमुख सुरेश पोटले आपटे प्रमुख मधुमती नाईक आदींसह संस्थेचे सर्व संचालक,सभासद,खातेदार,हितचिंतक,भागधारक,सर्व शाखांचे,शाखाधिकारी संभासद,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर वर्धापनदीन सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी संस्थेचे माणगाव शाखाधिकारी राकेश पडवळ,मोर्बा संदीप सकपाळ,महाड सुशांत जाधव,बिरवाडी संगीता श्रीहरी जाधव,रंजना येळकर,सोनल येळकर,प्रेम पंडागळे,उरण राम म्हात्रे,अंबरनाथ राजेश काठवले,नेरळ संदीप वाकळे,नाशिक शांताराम गडकरी,कामोठे सुनील हिलाल,डोंबिवली शाखा अधिकारी अन्वी कदम,कामोठे सुदाम कानवडे,अंबरनाथ कुलदीप पवार,माणगाव कु. लतिका पोटले,अक्षता मोरे,साक्षी कदम, उत्कर्षा पिरदणकर,प्राची महाडिक,संजीवनी सकपाळ,सुरेश पोटले,पूजा शिर्के,भक्ती नागावकर,महाड – पोलादपूर मंगेश साळुंखे व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.









