कमल भिंगारे यांचे दुःखद निधन
माणगाव प्रतिनिधी
माणगाव शहरातील साईनगर पश्चिम मधील जाई जुई सहनिवास मधील रहिवासी कमल दशरथ भिंगारे यांचे सोमवार दिनांक ३ जुलै रोजी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कमल भिंगारे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या निधनाची वार्ता समजताच भिंगारे परिवार आणि साईनगर रहिवासी मंडळ आणि सगेसोयरे नातेवाईक आणि आप्तेष्टांवर एकच शोककळा पसरली. त्यांच्यावर काळनदी माणगाव पोलीस ठाण्याच्या मागील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कमल भिंगारे या साईनगर महिला मंडळाच्या सक्रिय सदस्या होत्या. साईनगर गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव तसेच हळदी कुंकू समारंभ यामध्ये कमल भिंगारे हिरहिरीने सहभागी व्हायच्या. त्यांचे पती दशरथ भिंगारे हे एस टी महामंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून श्रीवर्धन आगारामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुन, नात असा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी साईनगर पश्चिम कालवा परिसर,जाई जुई सहनिवास बी विंग येथे होणार आहेत.








