राष्ट्रीय नेते व संस्थापक अध्यक्ष मा. महादेव जानकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, चर्चा व निर्णय
खोपोली – दत्तात्रय शेडगे
राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिनांक २५ जुलै २०२६ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथील राष्ट्रीय कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नेते व संस्थापक अध्यक्ष श्री. महादेव जानकर जी होते.
या बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
१. सदस्य नोंदणी अभियान
दरवर्षी १९ एप्रिल ते २९ ऑगस्ट या कालावधीत पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येते. या अभियानामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक सदस्यत्वासोबत सक्रिय सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
सर्व पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी प्राथमिक सदस्यत्वासोबत सक्रिय सदस्यत्व घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वांनी पक्षाचे सदस्यत्व घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी काम करावे, असा निर्णय घेण्यात आला.
२. पक्षाचा स्थापना दिवस
दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो.
यावर्षीपासून राष्ट्रीय समाज पक्षाचा स्थापना दिवस भारताच्या प्रत्येक राज्यात, संबंधित राज्याच्या राजधानीमध्ये, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य कार्यकारिणीच्या आयोजनाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३. युवा जोडो संकल्प अभियान
देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात “युवा जोडो संकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे.
हे अभियान राबविताना २९ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्हा, शहर आणि गावामध्ये पक्षाचा स्थापना दिवस साजरा करावा, तसेच युवा जोडो संकल्प अभियानासोबत त्याचा अहवाल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
४. पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांसाठी सूचना
ज्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप पक्षाचे सक्रिय सदस्यत्व घेतलेले नाही, त्यांनी प्रथम सक्रिय सदस्यत्व घ्यावे.
प्राथमिक सदस्यत्वासोबत सक्रिय सदस्यत्व घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तहसील व जिल्हास्तरावर युवा जोडो संकल्प अभियान प्रभावीपणे राबवावे.
विद्यार्थ्यांना देशातील सद्यस्थितीची जाणीव करून देऊन त्यांच्यामध्ये सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांबाबत जागृती निर्माण करावी.
प्रमुख सामाजिक व राष्ट्रीय मुद्दे
युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून पुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे—
- महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली होणारे ब्लॅक मार्केटिंग / काळाबाजार यांसारखे प्रश्न.
- शेतकऱ्यांच्या सर्व कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रश्न.
- देशातील उद्योग व संपत्ती भांडवलदारांच्या हातात सोपविण्याचा प्रश्न.
- सरकारी नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती.
- देशातील वाढती बेरोजगारी.
- विद्यार्थी, युवक, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांबाबत जनजागृती.
- आजच्या युवकांना जागृत करण्याची गरज असून, या अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक, आर्थिक व राष्ट्रीय प्रश्नांबाबत जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, असे बैठकीत ठरविण्यात आले.
- २९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या २३ व्या स्थापना दिवसापर्यंत अभियान तीव्र करण्याचा निर्णय
- वरील महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि महिलांना जागृत करण्याचे अभियान अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- तसेच स्थापना दिवसापर्यंत देशातील प्रत्येक राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.










