प्रतिनिधी माणगाव
देशात अनेक सरकारं आली आणि गेली अनेक सत्ताधीश आले आणि गेले पण जनतेशी एवढं निष्ठुर आणि निर्दयी वागणारं अहंकारी सरकार याआधी देशानं कधीही पाहिलं नसल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार,शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री.प्रभाकर मसुरे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे व्यक्त केली आहे.
देशात आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर असून सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन केले की सत्ताधारी विरोधी पक्षाच्या कार्यालयावर घरावर आंदोलन करतात सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना विविध प्रलोभन दाखवून खरेदी केली जातात. विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर स्वपक्षात घेतलं जात आहे.
आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर दडपशाही केली जाते आंदोलकांना नक्षलवादी अतिरेकी,दहशतवादी, ठरविले जाते त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविले जाते. मागे मराठा समाजाने आरक्षणासाठी अंतरवाली सराटी मध्ये आंदोलन केलं शांततेने चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावून पोलिसांकरवी निष्पाप मुलं,ज्येष्ठ नागरिक महिलांवर निर्दयीपणे बे रात्री लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केलं.
माणुसकीला काळीमा फासण्याचे काम राज्य सरकारने त्यावेळी केलं
आणि आता
केंद्रातील शिक्षण मंत्र्याच्या विरोधात समाजसेवक श्री सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत त्याची साधी दखलही सरकारला घ्यावीशी वाटली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर भयंकर अमानुष, अमानवी माणूसकिला लाजवणारा लाठीमार करून अनेक विद्यार्थ्यांना जायबंदी करून अनेकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचं अमानवी काम एका शिक्षण मंत्र्याला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने केलं. आपला हा अहंकारीपणा दाखवून दिला असून देश स्वातंत्र्याच्या नंतर एवढं निष्ठूर अहंकारी सरकार या देशाने कधीही पाहिलं नसून याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल असेही प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रभाकर मसूरे यांनी नमूद केले आहे.










